रहिमाबाद येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भजनसंध्या

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): रहिमाबाद येथे नागेश्वर प्रसादिक नाट्य व भारुड मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंतीनिमित्त गुरूवारी (ता.३०) भजनसंध्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहीर रत्नाकर जैन होते. सुरुवातीला पोलीस पाटील विलासराव चिंचपुरे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे पुजन करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित समाजप्रबोधन पर भजन, गीताचे गायन करण्यात आले.

 यावेळी मनोहर सुरडकर, पांडुरंग शिंदे, हिम्मत भुते, रायभान शिंदे, दत्ता जाधव, प्रभाकर शिंदे, गजानन डमाळे, सुदाम काटोले, अभिषेक राऊत, सागर जाधव, सोनाजी सिरसाठ, सुरेश शिंदे, पुंडलिक गाढवे, रामपाटील शिंदे लक्ष्मण शिंदे, दगडुबा शिंदे, आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.